आमच्याबद्दल

परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास

शिवराय आर्ट्स हे २००५ पासून पारंपरिक फायबर गौरी बॉडी निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले विश्वासार्ह नाव आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक गौरी पूजनासाठी आकर्षक, सुंदर आणि टिकाऊ गौरी बॉडी तयार करण्यामध्ये आम्हाला विशेष अनुभव आहे.

उत्कृष्ट दर्जाचे फायबर मटेरियल, आकर्षक रंगसंगती आणि बारकाईने केलेली कलाकुसर यांचा सुंदर संगम आमच्या प्रत्येक गौरी बॉडीमध्ये पाहायला मिळतो.

आमच्या बॉडी पारंपरिक महाराष्ट्रियन संस्कृती आणि सणांच्या भावनेला जपून तयार केल्या जातात. प्रत्येक डिझाईनमध्ये सौंदर्य, भक्ती आणि पारंपरिकता विशेष विचार केला जातो.

आमची ओळख

महाराष्ट्रातील उत्कृष्ट दर्जाच्या फायबर गौरी बॉडी निर्मितीसाठी ओळखले जाणारे शिवराय आर्ट्स हे नाव आज गुणवत्ता, विश्वास आणि नावीन्य यांचे प्रतीक बनले आहे. पुण्यातील कात्रज, गुजरवाडी येथे श्री. शैलेश मालुसरे यांनी २१ वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली.

आजपर्यंत शिवराय आर्ट्समध्ये दीड लाखांहून अधिक फायबर गौरी बॉडींची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक गौरी बॉडी उच्च दर्जाच्या फायबर मटेरियलपासून तयार केली जाते. अचूक फिनिशिंग, प्रायमर कोटिंग आणि टिकाऊ पेंटिंगमुळे आमची उत्पादने आकर्षक, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असतात.

आमच्या फायबर गौरी बॉडींची मागणी महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये तसेच परदेशातही आहे. सुंदर डिझाईन, सहज जोडणी, १००% वॉशेबल फिनिश आणि दीर्घकालीन टिकाऊपणा ही आमच्या उत्पादनांची खास वैशिष्ट्ये आहेत.

गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हेच आमच्या यशाचे सूत्र आहे. याच बळावर शिवराय आर्ट्सने फायबर गौरी बॉडी निर्मिती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आमची वैशिष्ट्ये

१०० ते १५० वर्ष टिकणारी मजबूत फायबर गौरी बॉडी

उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल आणि टिकाऊ रंगसंगती

पारंपरिक महाराष्ट्रियन डिझाईन आणि आकर्षक कलाकुसर

ग्राहकांच्या विश्वासासह अनेक वर्षांचा अनुभव

परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास

महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पारंपरिक गौरी पूजनासाठी सुंदर, आकर्षक आणि उच्च गुणवत्तेच्या फायबर गौरी बॉडी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. पारंपरिक संस्कृती जपत उत्कृष्ट कलाकुसर, आकर्षक डिझाईन आणि टिकाऊ गुणवत्ता यांचा सुंदर संगम आम्ही प्रत्येक बॉडी मध्ये साकारतो. ग्राहकांचा विश्वास आणि समाधान हेच आमचे खरे यश आहे.

गौरी गणपती घराघरात… शिवराय आर्ट्स मनामनात